बिजगर्णीत गुरुवारी कुस्ती मैदान
बेळगाव : बिजगर्णी येथील कुस्तीगीर संघटना व श्री कलमेश्वर फार्मस प्रोसेसिंग सोसायटी आयोजित भव्य कुस्ती मैदान गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी ब्रह्मलिंग मंदिर बिजगर्णी येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर मैदान तालीम बचाव, पैलवान घडाव, मैदान दंगल बनाव या धर्तीवरती कुस्ती मैदानाचे आयोजन मोनाप्पा भास्कर यांनी केले आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक चॅम्पियन शिव दड्डी दर्गा वि. महाराष्ट्र चॅम्पियन सचिन चव्हाण सांगली यांच्यात, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी वि. कुबेर रजपूत मिरज यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती युवराज मेथर कोल्हापूर वि. पृथ्वीराज पाटील कंग्राळी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रवीण चौगुले कोल्हापूर वि. राजू शिनोळी राशिवडे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती शुभम पाटील राशिवडे वि. महेश बिर्जे तिर्थकुंडये, सहाव्या क्रमांकाची कुस्ती विनायक येळ्ळूर वि. प्रवीण निलजी, मोदगा यांच्यात, सातव्या क्रमांकाची कुस्ती ओम कंग्राळी वि. मृणाल पाटील राशिवडे, आठव्या क्रमांकाची कुस्ती अरिहंत पाटील राशिवडे वि. रोहन कडोली, नवव्या क्रमांकाची कुस्ती अजित बडस वि. श्री घाडी भांदुर गल्ली, दहाव्या क्रमांकाची कुस्ती राजू कार्वे राशिवडे वि. महांतेश संतिबस्तवाड यांच्यात होणार आहे. याशिवाय आकर्षण कुस्ती सोहम खादरवाडी, श्रीनाथ गुरव बेळगुंदी, स्वयंम शिनोळी, प्रकाश पाटील, आकाश पुजारी निटूर, अंबारी बिजगर्णी यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठ्या 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.