महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

येळ्ळूर परिसरात वळिवाचा दणका

10:04 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान : महिला जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Advertisement

येळ्ळूर : यावर्षी वळिवाने येळ्ळूर परिसरात हुलकावणी दिली होती. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या. शुक्रवारी पहिल्याच दमदार वळिवाने येळ्ळूरवासियांची दाणादाण उडविली. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. सिद्धेश्वर गल्लीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. या घटनेत एक महिला जखमी झाली. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला आहे. घरावरील संपूर्ण पत्रेच उडून गेल्याने हे कुटुंबच उघड्यावर पडले आहे. शुक्रवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पाऊस सुरू होण्यापूर्वी वादळी वारा आला. यामुळे राजाराम कृष्णा हुंदरे यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून शिवारामध्ये गेले. यावेळी त्यांच्या सूनबाई सोनाली योगेश हुंदरे या किरकोळ जखमी झाल्या. घरी लहान मुले होती. मात्र सुदैवानेच कोणालाच इजा पोहोचली नाही. भर पावसातच ही घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला. लहान मुलांसह घरातून बाहेर पडून शेजाऱ्यांच्या घरी या कुटुंबाने धाव घेतली. या घटनेत जवळपास 2 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. वळिवाच्या जोरदार आगमनामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दुपारी 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल एक तास दमदार पाऊस पडला. याच काळात जोरदार वारा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तसेच झाडेदेखील कोसळली आहेत. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली होती. या पावसामुळे साऱ्यांनाच काहीसा दिलासा मिळाला असला तरी पहिल्याच वळिवाने मोठे नुकसान केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article