For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Atpadi Rain | आटपाडीत वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस; डाळिंब बागा उद्ध्वस्त, लाखो रुपयांचे नुकसान!

04:16 PM May 25, 2026 IST | NEETA POTDAR
atpadi rain   आटपाडीत वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस  डाळिंब बागा उद्ध्वस्त  लाखो रुपयांचे नुकसान
Advertisement

                                            आटपाडीत वादळी पावसाचा कहर

Advertisement

आटपाडी : आटपाडी शहर आणि परिसरात रविवारी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास नांगरेमळा, लिंगेवस्ती, तलाव परिसरात प्रचंड बादळी वारे आणि पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. लिंगेबस्ती येथे झाडे पडून मुऱ्हा जातीची म्हैस ठार झाली. तर अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. बीजेचे खांब आणि तारा तुटून पडल्या. नांगरेमळा येथे ढगफुटीसदृश्य पावसाने डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या.

आटपाडी शहर आणि परिसरात दुपारी साडेतीन ते चार वाजल्यापासुन प्रचंड बीजांच्या कडकडाटासह बादळी बाऱ्यांनी थैमान घातले. पाऊस कमी आणि बादळ जोरात असल्याने अनेक भागात नुकसान झाले. आटपाडीतलावालगत असलेल्या लिंगेवस्तीला वादळाचा मोठा फटका बसला. संजय लिंगे यांच्या घरासमोरील भलीमोठी झाडे उन्मळून, तुटून पडली. तुटलेल्या झाडाखाली सापडून त्यांच्या मालकीची दीड लाख रूपये किंमतीची एक मुऱ्हा जातीची म्हैस ठार झाली.
तर अन्य जनावरे जखमी झाली.

Advertisement

विलास लिंगे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. धनंजय लिंगे यांच्या घराच्या भिंतीचे नुकसान झाले. लिंगेबस्ती आणि परिसरातील अन्य लोकांच्याही घराचे पत्रे उडून जाण्यासह झाडे उन्मळून पडणे, बीजेचे खांब पडणे,
बीजेच्या तारा तुटणे असा प्रकार घडला. त्यामुळे आटपाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या बीजपुरवठ्याचेही नुकसान झाले.

आटपाडी-नांगरेमळा येथे बादळी वाऱ्यांसह ढगफुटीसदृश्य पाऊस बरला. बादळ आणि पावसामुळे येथील विनोद यादव यांच्या डाळिंब बागेचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. बागेवरील आच्छादन फाटून, झाडे उन्मळून पडणे, झाडावरील डाळिंब तुटुन पडणे असे प्रकार घडले. बागेत सर्वत्र तुटलेल्या डाळिंबाचा सडा पडला आहे. त्याशिवाय रामचंद्र नांगरे, रामचंद्र बिलास नांगरे, महेश नांगरे, पियुष नांगरे, मारूती हजारे, दादासो पवार, रावसाहेब सागर, प्रविण नांगरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

Advertisement
Tags :

.