For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

त्रिशूरच्या शाळेत माजी विद्यार्थ्याकडून गोळीबार

06:12 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
त्रिशूरच्या शाळेत माजी विद्यार्थ्याकडून गोळीबार
Advertisement

त्रिशूर :

Advertisement

केरळच्या त्रिशूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका युवकाने मंगळवारी एका शाळेत गोळीबार केला आहे. गोळीबार करणारा युवक हा शाळेचा माजी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांनी आरोपी युवकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गोळीबाराची ही घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मुलायम येथील रहिवासी असलेल्या जगनने मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याचे मानले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.