For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सोलापुरात थरारक दरोडा; खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून 25 लाखांची लूट

03:31 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापुरात थरारक दरोडा  खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून 25 लाखांची लूट
Advertisement

                           कारंबा नाक्यावर आठ जणांच्या टोळीचा दरोडा

Advertisement

सोलापूर : शहरातील कारंबा नाका परिसरात थरारक दरोड्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या आठजणांच्या टोळीने एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकास मारहाण करून त्यांच्याकडील तब्बल २५ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

फिर्यादी गजेंद्रसिंह बनुजी चावडा (वय ४८, मॅनेजर, बीर एंटरप्रायजेस कंपनी, अहमदाबाद) हे मंगळवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास मार्केट यार्ड, सोलापूर येथून आपल्या राहत्या घरी जात होते. ते कारंबा नाका येथील गतिरोधकाजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनाजवळ येत अचानक अडवले. यानंतर आरोपींनी फिर्यादीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून वाहनावरून खाली पाडले.

झटापटीदरम्यान फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ चावा घेतला. त्यानंतर आरोपींनी वाहनाच्या डिक्कीमध्ये ठेवलेली २५ लाख रुपयांची रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. दरोडा टाकणारे संशयित मोटारसायकलवरुन एकूण आठजण असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची नोंद ८ जानेवारी रोजी करण्यात आली. सहायक निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.