For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime |आधी बेपत्ता असल्याची तक्रार, मग विहिरीत मृतदेह... कोल्हापूर हादरवणारा कौटुंबिक थरार!

10:58 AM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime  आधी बेपत्ता असल्याची तक्रार  मग विहिरीत मृतदेह    कोल्हापूर हादरवणारा कौटुंबिक थरार
Advertisement

                                 दारूच्या त्रासाला कंटाळून मुलानेच केली वडिलांची हत्या

Advertisement

पुलाची शिरोली :शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका गुंतागुंतीच्या खुनाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलानेच आपल्या मित्राच्या मदतीने पित्याचा निघृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एखाद्या चित्रपटातील घटनेला लाजवेल अशी ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी मुलगा रेहान फिरोजमुजावर (वय २०) आणि त्याचामित्र वीरपाशा सैंदुलाल जहाँगीरदार(रा. हनुमाननगर, शिये) या दोघांनाअटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिये (ता. करवीर) येथील हनुमान नगर मधील फिरोज खानसो मुजावर (वय ४४) हे २९ मे २०२६ पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मुलगा रेहान यानेच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना २ जून रोजी सकाळी शिरोली हद्दीतील एमआयडीसी भागातील 'घोल" नावाच्या शेतातील विहिरीत एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढून सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर शवचिकित्सेसाठी पाठवला.

Advertisement

यावेळी मृताच्या तोंडात कापड कोंबलेले होते आणि डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने गंभीर वार केल्याचे समोर आले.स.पो.नि. सागर वाघ यांच्या रेहान मुजावरबीरपाशा जहाँगीरवारपथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. तपासादरम्यान, संशयित रेहान मुजावर हा पोलिसांचीदिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी रेहानला विश्वासात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर यांच्यामार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ, शिरोलीचे सपोनि सुनील गायकवाड, पीएसआय प्रमोद चव्हाण, अमित पांडे, संदीप पाटील, रामचंद्र कोळी, महेश अंबी, महेश खोत, वसंत पिंगळे, नजीर शेख, सुहास संकपाळ आणि निलेश कांबळे यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

Advertisement
Tags :

.