Sangli Crime | माणगंगा नदीपात्रात ६ जूनच्या पहाटे काय घडलं? वाळू तस्करांचा आणि लेडी तहसीलदारांचा 'तो' दीड तासाचा थरार!
आटपाडीत तहसीलदारांचा थरारक पाठलाग
आटपाडी : अवैध वाळू उत्खननव वाहतुकीबर करवाई करणाऱ्या आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर यांच्या बाहनांच्या आडवे अडथळे निर्माण करून वाळू तस्करांनी पोबारा केला. तहसीलदार आणि बाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये दीड तासाचा हाय होल्टेज थरार झाला. पण, तहसीलदारांच्या हातावर तुरी देऊन बाळू तस्कारांनी शेजारच्या सांगोला तालुक्यात धुम ठोकली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशाने, प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर यांनी बाळू तस्करीवर कारवाईसाठी पाऊल उचलले.
रविवारी सकाळी सुमारे सहाच्यासुमारास तहसीलदार शितल बंडगर या सहकाऱ्यांसह महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील माणगंगा नदीपात्रात गस्त घालत होत्या. त्यावेळी नदीपात्रात अवैध बाळू उत्खननासाठी इंट्रा पिकअप आणि निळ्या रंगाचा हायवा ट्रक आढळुन आला. त्यावर कारवाईसाठी पथक आलेले असताना दोन्ही बाहनांच्या चालकांनी महसुल पथकाला आव्हान देत बाहने पळविली.
तहसीलदार बंडगर यांनी त्या गाड्यांचा पाठलाग केला. देशमुखवाडी येथून निघालेली ही बाहने सोनलवाडी, बागलवाडी, बेंदबस्ती, कटफळ मार्गे महूदच्या दिशेने पळून गेली.