For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur -Ratnagiri Highway Accident | कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर थरार! २० लाखांचे टायर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

04:13 PM Jun 24, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur  ratnagiri highway accident   कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर थरार  २० लाखांचे टायर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग
Advertisement

Advertisement

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झालाय.आवळी फाट्याजवळ टायरने भरलेल्या आयशर ट्रकला अचानक भीषण आग लागली. ही आग एवढी भयानक होती की, संपूर्ण ट्रक आणि त्यातील तब्बल २० लाख रुपयांचे टायर जळून खाक झालेत.

"कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. बेळगावहून रत्नागिरीच्या दिशेने २० लाख रुपयांचे नवीन टायर घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची रोड डिव्हायडरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या केबिनमध्ये तात्काळ शॉर्टसर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला. ट्रकमध्ये रबरी टायर असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि अख्खा ट्रक आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाला."

Advertisement

"घटनेची माहिती मिळताच बोरपाडळे आणि कोडोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोल्हापूर आणि मलकापूरवरून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत ट्रकचा कोळसा झाला होता. सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र लाखोंचे नुकसान झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत."

Advertisement
Tags :

.