For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफीचा थरार

06:58 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफीचा थरार
Advertisement

चारही संघ जाहीर : रोहित, विराट, बुमराहला विश्रांती : शुभमन गिल, ईश्वरन, ऋतुराज, अय्यरकडे नेतृत्वाची धुरा 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, मुंबई

बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर नेतृत्व करताना दिसणार आहेत. गिल टीम ए चा कर्णधार असेल, ईश्वरन टीम बी चा कर्णधार, टीम सी चा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर टीम डी चा कर्णधार असेल. दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली दुलीप ट्रॉफी खेळतील अशी आशा होती. मात्र, बीसीसीआयने त्यांना विश्रांती दिली आहे. या दोघांसह आर. अश्विन अन् जसप्रीत बुमराह देखील दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत. या स्पर्धेला सुरुवात 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Advertisement

यंदाच्या वर्षापासून बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीचा फॉरमॅट बदलला आहे. याआधी ही देशांतर्गत स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती, मात्र आता यामध्ये चार संघ सहभागी होणार आहेत. आता या स्पर्धेत इंडिया-ए, इंडिया-बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे चार संघ खेळणार आहेत. या सर्व संघांची घोषणा बुधवारी करण्यात आली. दरम्यान, हे सामने आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जातील.

या स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून 22 सप्टेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. प्रत्येक संघ तीन सामने खेळणार असून या स्पर्धेत अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद सिराज, इशान किशन, सर्फराज खान, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, तिलक वर्मा, आवेश खान, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा टी 20 कर्णधार सुर्यकुमार यादव ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार आहे.

इशान किशन, श्रेयस अय्यरही खेळणार

मागील काही महिन्यापासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी न झालेल्या व बीसीसीआयच्या वार्षिक कराराला मुकेलेले इशान किशन व श्रेयस अय्यर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यर इंडिया डी संघाचा कर्णधार आहे तर इशानही याच संघाचा सदस्य आहे. यामुळे दुलीप ट्रॉफीत या दोघांची कामगिरी कशी होते, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

रोहित, विराट, बुमराहला विश्रांती

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, दिग्गज खेळाडू विराट कोहली दुलीप ट्रॉफीत खेळणार अशा चर्चा होत्या. मात्र, बीसीसीआयने या दोन्ही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर, दुसरीकडे आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना देखील विश्रांती देण्यात आली आहे. आगामी काळात भारताचे बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने आहेत, त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंची उपस्थिती संघात महत्त्वाची असणार आहे. पुढील काळात टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक असल्याने महत्वाचे खेळाडू तंदुरुस्त असणे आवश्यक असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चार संघ पुढीलप्रमाणे -

  1. इंडिया ए - शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुश कोटियान, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, व्ही. कवरप्पा, कुमार कुशाग्र आणि शास्वत रावत.
  2. इंडिया बी - अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रे•ाr (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंगटन सुंदर, रविंद्र जड़ेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी आणि एन जगदीशन (विकेटकीपर).
  3. इंडिया सी - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल (विकेटकीपर) आणि संदीप वॉरियर.
  4. इंडिया डी - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सांराश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.

Advertisement
Tags :

.