For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jaysingpur News | जयसिंगपुरात थरार! आईने दोन चिमुकल्यांसह संपवले जीवन, शहरात खळबळ

05:11 PM Aug 23, 2026 IST | NEETA POTDAR
jaysingpur news   जयसिंगपुरात थरार  आईने दोन चिमुकल्यांसह संपवले जीवन  शहरात खळबळ
Advertisement

जयसिंगपूर -जयसिंगपूर शहरातील नांदणी रोडवरील मच्छी मार्केट भागात राहणाऱ्या विवाहिता संगीता राजू गाडीवडर (वय २५) हिने आपली मुलगी प्रगती (वय ५), मुलगा प्रतीक (वय दीड ते पावणे दोन वर्षे) यांच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement

यामुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊनपाहणी केली. घटनेचा पंचनामा केला. तिन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मिरज येथील नागरी रुग्णालयात पाठवले आहेत.

घटनेची माहिती संगीता हिच्या माहेरच्या नातेवाईकांना समजताच, त्यांनी देखील कर्नाटक राज्यातीलसावळगी जिल्हा बागलकोट येथून जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यावेळी मृतदेह पाहून सर्वांनीच हंबरडा फोडून आक्रोश केला. संगीताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अशी घटना शहरात प्रथमच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.