Kupwad News | कुपवाडच्या विठूमाऊली चौकात थरार! पैशांच्या वादातून तरुणाचे फोडले डोके
कुपवाडमध्ये तरुणावर दगडाने हल्ला
कुपवाड : कुपवाडमध्ये एकातरुणाला आर्थिक कारणातून तसेच किरकोळ झालेल्या वादातून तिघांनी मिळून डोक्यात दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत अमोल श्रीपाल माळी (वय ३४, रा.तराळ गल्ली, कुपवाड. मूळ गाव खंडेराजूरी माळी वस्ती, एरंडोली ता. मिरज) हा तरुण जखमी झाला आहे.
घटनेची कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित सोनाली राजू जाधव (रा.तराळ गल्ली, कुपवाड), पायल महेश वडर (रा. शारदानगर, गल्ली नंबर १, कुपवाड) व अविनाश संजय शिंदे (रा. सूतगिरणी जवळ, कुपवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
२७त्यांचेविरोधात अमोल माळी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमोल माळी व संशयित सोनाली जाधव या दोघांत आर्थिक कारणातून शहरातील विठूमाऊली चौकात किरकोळ बाद सुरू होता.
या वादातून संशयित सोनाली जाधव, पायल बडर, अविनाश शिंदे या तिघांनी अमोल माळी याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. संशयित अविनाश शिंदे यांनी अमोल माळी याच्या डोक्यात दगडाने मारहाण केल्याने माळी जखमी झाला.
याप्रकरणी अमोल माळी याने संशयित तिघांविरोधातकुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.