Tavandi Ghat accident | तवंदी घाटात थरार! कंटेनरची ट्रकला जोरदार धडक; भीषण अपघातात दोघे गंभीर
तवंदी घाटात भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला जोरदार धडक
कोल्हापूर : तबंदी तवंदी घाटात कंटेनरची मालवाहू ट्रकला धडक बसल्याने ट दोघेजण गंभीर झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या ने सुमारास घडली. या अपघातामध्ये का वाहनांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर दोन्हीही वाहने ज बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने ल जात होती. दरम्यान, कंटेनर वो चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने न मालवाहू ट्रकला जोराची धडक दिली.
त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी अवताडे कंपनीचे कर्मचारी संतराम माळगी व त्यांच्या सहकाऱ्यांनीभेट देऊन पाहणी केली. यानंतर दोघाडी चालकांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेचा अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करीत आहेत. सध्या सहा पदरीकरणाच्या कामामुळे बऱ्याच वेळा वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत.
याची दखल घेताना वाहनधारकांनी वाहने सावकाश हाकावीत. तसेच प्रशासनानेही योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.