For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्साभाट- म्हापशातील तीन युवक ताब्यात

12:46 PM Jun 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
अन्साभाट  म्हापशातील तीन युवक ताब्यात
Advertisement

कोलवाळ तुरुंगात गांजा तस्करी प्रकरण : कुंपणावरून गांजाचे बॉल फेकून तस्करी,कैद्याला देण्यासाठी आणला होता ,1 किलो 400 ग्रॅम गांजा

Advertisement

म्हापसा : म्हापसा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोलवाळ जेलमध्ये चक्क तुरूंगाच्या भल्या मोठ्या कुंपणावरून भले मोठे गांजाचे गोळे फेकून अमलीपदार्थ तस्करीचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अखेर कोलवाळ पोलिसांनी मंगळवारी म्हापसा अन्साभाट येथील पेद्रू गार्डनमधील चारजणांना पोलिसांनी गजाआड करण्यास यश मिळविले. यातील एक युवक अल्पवयीन असल्याने त्याला अपना घरमध्ये ठेवण्यात आले आहे. या धरपकड झटापटीत एका युवकाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याची माहिती उघडकीस आली आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या गुह्यात सापडलेला मुख्य संशयित आरोपी एका राजकीय नेत्याच्या आस्थापनात कामाला होता त्यामुळे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या तिघाही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी तुरुंगातील गार्ड, अधिकारी वा सुरक्षारक्षकांना हाताशी धरून अमलीपदार्थ, मोबाईल आदी सामान आतमध्ये नेत असताना पकडल्याच्या घटना घडल्या आहेत,  मात्र चक्क तुरुंगाच्या भल्या मोठ्या कुंपणावरून भले मोठे गांजाचे गोळेच फेकून अमलीपदार्थ तस्करीचा हा नवीन प्रकार उघडकीस आल्याने खरोखरच कोलवाळ तुऊंगातील सुरक्षा ढासळली आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. येथे अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षारक्षक फौज असताना आतमध्ये गांजा पुरविण्याचा प्रकार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंगळवारी रात्री संशयितांच्या घरी छापा

Advertisement

मंगळवारी रात्री पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा उपअधीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक संजीत कांदोळकर व पोलिस पथकांनी धरपकड करून म्हापसा पेद्रूभाट येथे या युवकांच्या घरात छापा मारून त्यांना ताब्यात घेतले व रितसर कारवाईनंतर चारजणांना अटक करण्यात आली आहे. पैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला अपना घरमध्ये पाठविण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गौतम राजेंद्र तलवार (वय 24, रा. पेद्रू अपार्टमेंट अन्साभाट म्हापसा), सेम्युअर प्रेमकुमार पुजारी (वय 24, रा. अन्साभाट), जाफर नूर अहम्मद मुल्ला (वय 24 रा. गंगानगर खोर्ली) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

कुंपणावरून आतमध्ये टाकताना अंदाज चुकल्याने गांजा पहारेकरांच्या ताब्यात

याबाबत सेंट्रल जेल कोलवाळच्या उपअधीक्षकांनी आपल्या अहवालातून दिलेल्या लेखी तक्रारीनुसार 14 जून रोजी या मुलांनी तुरुंगाच्या पाठीमागून सुमारे एक किलो गांजाचे गोल बॉल तुरुंगात फेकले. हे गांजा बॉल एका कैद्याला पुरविण्यासाठी आणले होते. तो कैदी या युवकांना मोबाईलवरून संपर्कात होता, असे प्रथमदर्शनी चौकशीअंती आढळून आले आहे. येथे आतमध्ये पोलिस शिपाई प्रशांत नाईक आपली ड्युटी बजावत असताना त्याने खाली पडलेली प्लास्टिकची पिशवी पाहिली. चौकशीअंती त्या पिशवीची शहानिशा केली असता आतमध्ये 7 गांजाचे बॉल होते. एकूण वजन केले असता ते 1 किलो 397 ग्रॅम होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत 1 लाख 40 हजाराच्या घरात जाते. याबाबत कोलवाळ पोलिसांनी पंचनामा करून हा गुन्हा नोंद करताना 42/2025 कलम 20(ब) घ्घ् (ब) अमलीपदार्थ कायदा 1985 अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन मुलाविऊद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या पालकांना बोलावून समज देऊन त्या मुलाला अपना घर मेरशी येथे पाठविण्यात आले आहे.

दोरीच्या सहाय्याने युवक चढत होते कुंपणावर

दरम्यान, याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे अमलीपदार्थ तुऊंगात पोहचविण्यासाठी कोलवाळ तुऊंगाच्या पाठीमागील जंगलातील भागातून हे युवक जात होते. अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू होता. या मागे अन्य काही सूत्रधार गुंतलेले आहेत. या युवकांना माल आतमध्ये पुरविण्यासाठी तुऊंगातील कैद्यानी भ्रमणध्वनीही पुरविले होते व 10 हजार रुपयांचा मोबदला मिळत होता. तुरूंगाच्या पाठीमागे जंगल भागात असलेल्या झाडाला दोरी बांधून हे युवक कुंपणावर चढत होते व अमलीपदार्थाची आतमध्ये तस्करी करीत होते, मात्र त्यादिवशी हा माल आतमध्ये फेकत असताना अंदाज चुकलाने ती पिशवी पहारेकऱ्याच्या हाती लागली व हा प्रकार उघडकीस आला आहे.

अन्य काही जाळ्यात अडकण्याची शक्यता

हा अमलीपदार्थ नेमका कुणाला देण्यास आणला होता यामागे अन्य कोणकोण गुंतले आहेत याची चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकारीवर्ग करीत आहे. कोलवाळ पोलिस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली याबाबत अधिक तपास सुरू आहे. अलिकडेच म्हापशात एका गाजलेल्या खूनप्रकरणातील काही संशयित या कारागृहात आहेत. गांजाची गोळाफेक करणारे व कारागृहात असलेले कैदी हे एकमेकांचे परिचयाचे असल्याने हा पुरवठा त्यांच्यासाठी होता, असे सूत्रांकडून समजते.

Advertisement
Tags :

.