दिल्लीत चकमकीनंतर तीन ‘वॉन्टेड’ना अटक
06:43 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
दिल्लीत रोहिणी परिसरात झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात वसीम हशमत टोळीच्या तीन शार्पशूटरना अटक केली आहे. आरोपींमध्ये रहमान (23), आदिल (23) आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार अशा तिघांचा समावेश आहे. हे तिघेही शास्त्राr पार्कमधील खळबळजनक ‘कामो पहेलवान’ हत्याकांडात ‘वॉन्टेड’ होते. कामो पहेलवानच्या अलिकडेच झालेल्या हत्येच्या तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार दिल्लीतील दोन कुख्यात टोळ्यांमधील रक्तरंजित भांडणातून हत्या झाल्याचे निदर्शनास आले होते. 30-31 डिसेंबर 2025 च्या रात्री गँगस्टर वसीम हश्मतची हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
Advertisement
Advertisement