For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशमूर्तीच्या तीन टन मातीचा होणार पुनःर्वापर

04:20 PM Mar 09, 2025 IST | Radhika Patil
गणेशमूर्तीच्या तीन टन मातीचा होणार पुनःर्वापर
Advertisement

कराड :

Advertisement

 गतवर्षी जलकुंभात पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आलेल्या शाहूच्या गणेशमूर्तींच्या मातीचा पुन:र्वापर करण्यात येणार आहे. जलकुंभात जमा करण्यात आलेली तीन टन माती मूर्तीकारांकडे सुपूर्द करण्यात आली. कराड नगरपालिका, एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब व छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपच्या माध्यमातून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

कराड नगरपरिषद व एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कराड शहरात दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मूर्ती व निर्माल्य विसर्जनामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कराडला पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन मोहीम राबवण्यात येते. यासाठी शहराच्या विविध भागात २२ जलकुंभ उभारले जातात.

Advertisement

तर निर्माल्य कलशाच्या माध्यमातून निर्माल्य जमा करण्यात येते. हजारोंच्या संख्येने घरगुती, विविध संस्था व काही मंडळांच्या गणेशमूर्तींचे या जलकुंभात विसर्जन करण्यात येते. विसर्जनानंतर पालिकेच्या वतीने यातील प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडूच्या मूर्ती वेगवेगळ्या केल्या जातात. प्लास्टरच्या मूर्ती व शाहूच्या मुर्तीचे वेगवेगळ्या शेततळ्यात विसर्जन करण्यात येते. तीन महिन्यानंतर शाहूच्या मूर्ती विसर्जित केलेल्या शेततळ्यातील माती काढून ती पुन्हा मूर्तीकारांना पुनःर्वापरासाठी दिली जाते. गेल्या वर्षी विसर्जित झालेल्या मूर्तीची माती नुकतीच मूर्तीकारांना देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विनायक पावसकर, सौरभ पाटील, अंजली कुंभार, एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशीद, आरोग्य निरीक्षक देवानंद जगताप, ए. आर. पवार, मनोज कुंभार, राहुल कुंभार, डॉ. सतीश घाटगे, बी. एस खोत, चंद्रकांत जाधव, रमेश पवार, प्रसाद पावसकर, एम. बी. शिंदे, विजय चौगुले, शिवाजी सूर्यवंशी उपस्थित होते. दरम्यान, कराह नगरपालिकेने राबवलेला उपक्रम आदर्शवत असून सर्वच नगरपालिका व संस्थांनी हा राबवण्याची आवश्यकता आहे

Advertisement
Tags :

.