तीन दहशतवाद्यांना मणिपूरमध्ये अटक
06:34 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ इंफाळ
Advertisement
मणिपूरच्या वेगवेगळ्या जिह्यांमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे तिघेही वेगवेगळ्या बंदी असलेल्या संघटनांशी संबंधित आहेत. आरोपींकडून शस्त्रs आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पहिल्या कारवाईत बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या एका सक्रिय सदस्याला इम्फाळ पूर्व जिह्यातील कोंगपाल चिंगंगबम भागातून अटक करण्यात आली. याचदरम्यान, ‘प्रेपाक’ संघटनेच्या 50 वर्षीय सदस्याला इंफाळ पश्चिम जिह्यातील अंबोईखोंग- नांगखोंग भागातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याच अन्य एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement