दाणोली हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
ओटवणे | प्रतिनिधी
सातारा येथे झालेल्या विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखीत देदीप्यमान यश संपादन केले. या शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेतील तीन प्रकारात विजय सुरेश जंगले, लक्ष्मण सुरेश जंगले, सुरेखा बिरू काळे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे त्यांची आता गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथे झालेल्या या शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेतील विविध प्रकारात या हायस्कूलच्या तब्बल १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात ३ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक,९ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, ३ विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक तर ३ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.या विभाग स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मयुरेश जानू वरक (३२ किलो), राज काशीराम जंगले (३७ किलो), संजय संतोष पाटील (४२ किलो), भागू बाजू जंगले (४७ किलो), नवनाथ विठ्ठल लांबर (५५ किलो), प्रदीप गंगाराम जंगले (३५ किलो), कु. अपूर्वा अनंत सावंत (२४ किलो), कु. वैदही महेश कासले (२८ किलो), कु. रंजना देऊ पाटील (५५ किलो) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. विघ्नेश कृष्णाजी आईर (२८ किलो), कु. तन्मई महेंद्र सावंत (३२ किलो), कु. प्रियांका काशीराम जंगले (४० किलो) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर दत्ताराम प्रकाश दळवी, प्रज्वल प्रकाश तायशेटे आणि सानिया हुसेन पटेल हे तीन विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरीचे मानकरी ठरले.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद नाईक व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.