कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हणजूण वाहतूक विभागातील तीन पोलिसांची बदली

06:16 AM Dec 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यटकांना लुटत असल्याचा आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

हणजूण वाहतूक पोलीस विभागाच्या तिघा पोलिसांची तडकाफडकी पणजीतील वाहतूक शिक्षण सेलमध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचा वायरलेस आदेश वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी शुक्रवारी 29 रोजी जारी केला आहे. गेल्या मार्चमध्येही याच पोलीस विभागाच्या 11 पोलिसांची बदली करण्यात आली होती.

बदली केलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन चोपडेकर, हवालदार गोविंद मांद्रेकर व कॉन्स्टेबल प्रशांत शेटये यांचा समावेश आहे. पर्यटकांकडून पैसे उकळण्याचा आरोप या तिघाही पोलिसांवर आहे. याप्रकरणी व्हिडीओ फुटेजसह संबंधित पर्यटकांनी वाहतूक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. प्राथमिक चौकशीअंती अधीक्षकांनी बदलीचा आदेश जारी करीत तत्काळ वाहतूक शिक्षण सेलमध्ये हजेरी लावण्याचे निर्देशही दिला आहे.

शुक्रवारी वाहतूक पोलीस अधीक्षकांनी वरील तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात पाचारण केले व त्यांची चौकशी केली आणि नंतर लगेच संध्याकाळी संबंधितांच्या बदलीचा आदेश जारी केला. या पोलिसांच्या तडाफडकी बदलीनंतर पर्यटकांना लक्ष्य बनविण्याच्या हणजूण वाहतूक पोलीस स्थानकाच्या कारभाराचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.

हणजूणमध्ये वाहतूक पोलीसच खासगी गाड्यांना भाडेपट्टीवर गाडी चालविण्यास  प्रोत्साहन देतात, अशा तक्रारी वारंवार रेन्ट-अ-बाईक व रेंट-ए-कार व्यावसायिक करीत आहेत. त्यामुळे या अगोदर हणजूण वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमदार डिलायला लोबो व मायकल लोबो यांनी प्रश्न उपस्थित केले होते. वाहन वाहतूक नियमांच्या नावाखाली या पोलिसांकडून फक्त पर्यटकांचीच छळवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article