For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनिर्णीत सामन्यात इंडिया क संघाला तीन गुण

06:22 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनिर्णीत सामन्यात इंडिया क संघाला तीन गुण
Advertisement

अन्शुल कंबोज : 69 धावांत 8 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ अनंतपूर

2024 च्या क्रिकेट हंगामातील येथे रविवारी इंडिया क आणि इंडिया ब यांच्यातील 4 दिवसांचा दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर इंडिया क ने 3 गुण वसुल केले. या सामन्यात इंडिया क संघातील वेगवान गोलंदाज अन्शुल कंबोजने 69 धावांत 8 गडी बाद केले.

Advertisement

या सामन्यात इंडिया क ने पहिल्या डावात 525 धावा जमविल्या. त्यानंतर इंडिया ब चा पहिला डाव 108 षटकात 332 धावांवर आटोपला. इंडिया ब च्या डावामध्ये अभिमन्यू ईश्वरनने नाबाद 157 तर नारायण जगदीशनने 70 धावा झळकाविल्या. इंडिया क च्या दुसऱ्या डावात ऋतुराज गायकवाडने 62 धावा जमविल्या. इंडिया क ने दुसऱ्या डावात दिवसअखेर 37 षटकात 4 बाद 128 धावा जमविल्या.

इंडिया ब संघाने 7 बाद 309 या धावसंख्येवरुन रविवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे उर्वरित 3 गडी 23 धावांची भर घालत तंबूत परतले. वेगवान गोलंदाज कंबोजने शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी 5 बळी मिळविले होते. आज त्याने आणखी 3 गडी बाद केले. या सामन्यात इंडिया क ने इंडिया ब वर पहिल्या डावात 193 धावांची आघाडी घेतल्याने त्यांना या अनिर्णित सामन्यात 3 गुण मिळाले.

संक्षिप्त धावफलक - इंडिया क प. डाव 124.1 षटकात सर्व बाद 525, इंडिया ब प. डाव 108 षटकात सर्व बाद 332 (ईश्वरन नाबाद 157, नारायण जगदीशन 70, कंबोज 8-69). इंडिया क दु. डाव 37 षटकात 4 बाद 128 (ऋतुराज गायकवाड 62, राहुल चहर 2-8).

Advertisement
Tags :

.