For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबाद विमानतळावर तीन विमानांना धमक्या

06:44 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
हैदराबाद विमानतळावर तीन विमानांना धमक्या
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

एकीकडे इंडिगो एअरलाइन्सच्या कोलमडलेल्या वाहतूक यंत्रणेमुळे प्रवासी त्रस्त असतानाच हैदराबाद विमानतळावरील तीन विमानांना रविवारी रात्री उशिरा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. विमानतळावरील प्रशासकीय विभागाला ई-मेलद्वारे धमक्या मिळाल्याचे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. धमकी दिलेल्या दोन विमानांपैकी दोन आंतरराष्ट्रीय उ•ाणे होती. तिन्ही विमानांच्या तपासणीमध्ये कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटकजन्य वस्तू सापडली नसल्याची माहिती देण्यात आली. कन्नूरहून हैदराबादला जाणारे विमान 6ई7178 हे धमकीमुळे 7 डिसेंबर रोजी रात्री 10:50 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तसेच फ्रँकफर्टहून हैदराबादला पोहोचणारे विमान एलएच752 मध्यरात्री 2:00 वाजता उतरले. तसेच हीथ्रोहून हैदराबादला येणारे विमान बीए277 सोमवारी पहाटे 5:30 वाजता सुरक्षितपणे उतरवून त्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.