For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात तिघांचा गोळीबारात दुर्दैवी मृत्यू

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियात तिघांचा गोळीबारात दुर्दैवी मृत्यू
Advertisement

न्यू साउथ वेल्समधील घटना

Advertisement

वृत्तसंस्था/केपटाऊन

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील एका शहरात गुरुवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तिघे ठार झाले असून अन्य एक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार करणारे हल्लेखोर अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबाराचे वृत्त समजल्यानंतर सुमारे 1,500 लोकसंख्येच्या लेक कारगेलिगो येथील एका पत्त्यावर आपत्कालीन सेवांना बोलावण्यात आले. तपासणीअंती दोन महिला आणि एका पुरुषासह तिघांचे मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी एका व्यक्तीला गंभीर परंतु स्थिर स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी जनतेला सदर परिसरात जाणे टाळण्याचे आणि स्थानिक रहिवाशांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.