महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केदारनाथ मार्गावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू

06:13 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्रातील दोघांचा मृतांमध्ये समावेश : 8 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ केदारनाथ

Advertisement

गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि दगड पडल्याने पायी मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन भाविकांना प्राणास मुकावे लागले. तसेच अन्य 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  किशोर अरुण पराते (31, रा. नागपूर महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (24, रा. जालना महाराष्ट्र), अनुराग बिश्त (तिलवाडा, रुद्रप्रयाग) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

दरड कोसळण्याची दुर्घटना रविवारी सकाळी 7.30 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींमध्ये दोघे महाराष्ट्रातील तर इतर स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले. केदारनाथ यात्रामार्गावर झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री धामी यांनी शोक व्यक्त केला आहे.

केदारनाथमधील 16 किमी लांबीच्या गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर  दरड कोसळण्याचा धोका असता. चिरबासा हे भूस्खलन क्षेत्र असून तेथे पावसाळ्यात डोंगरावरून दगड पडल्याने अपघात होतात. येथे गेल्यावषीही डोंगरावरून दरड कोसळल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article