For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : वाळवा तालुक्यातील पेठमध्ये संडास ड्रेनेजच्या टाक्यांत गुदमरुन तिघांचा मृत्यू

02:03 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   वाळवा तालुक्यातील पेठमध्ये संडास ड्रेनेजच्या टाक्यांत गुदमरुन तिघांचा मृत्यू
Advertisement

                                                  वाळवा तालुक्यात भीषण दुर्घटना

Advertisement

सांगली : वाळवा तालुक्यातील पेठ गावच्या हद्दीतील पुणे-बंगलोर मार्गाच्या लगत असणाऱ्या एपीके यान्स प्रा.ली.कंपनीच्या संडास ड्रेनेज मध्ये पडून तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला.तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पाचजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.ही घटना रविवारी सायंकाळी घडली.विशाल सुभाष जाधव (वय ३०,), सचिन तानाजी चव्हाण(३९,दोघे रा.विजयगड अपार्टमेंट बेघर वसाहत, ईश्वरपूर), सागर रंगराव माळी (२५, रा. पेठ, ता. वाळवा) अशी मृतांची नावे यामध्ये महादेव रामचंद्र कदम(४०,रा महादेववाडी)विशाल मारुती चोगुले (वय २४, ईश्वरपूर), केशव आनंदा साळुंखे (वय ४५, रा. निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (वय २७, रा. ओझर्डे, ता. वाळवा) आणि सुनील आनंदा पवार (वय २९, रा. रेठरेधरण, ता. वाळवा),अशी जखमींची नावे आहेत.

एपीके कंपनीच्या संडास ड्रेनेजचे काम सुरु होते.ड्रेनेजच्या टाक्यातील मैला उपसण्याचे काम करण्यासाठी हे कामगार उतरले होते.दरम्यान ऑक्सिजन वायू न मिळाल्याने ते गुदमरले.तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांचीही प्रकृती बिघडली.कंपनीचे सेप्टिक टँक साफ करण्यासाठी सुरुवातीला विशाल सुभाष जाधव हे टँकमध्ये उतरले होते. मात्र टँकमधील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते आतच पडले. त्यांना वाचवण्यासाठी चव्हाण यांनी टँकमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांनाही गुदमरल्याने त्रास होऊन तेही जागेवर बेशुद्ध पडले. त्यानंतर कंपनीतील कामगार सागर रंगराव माळी यांनी मदतीसाठी धाव घेतली. ते टँकमध्ये उतरल्यावर तेही गंभीर अवस्थेत अडकले.

Advertisement

या तिघांना सौरभ उत्तम कदम यांनीतातडीने उपचारासाठी कोयना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात कदम (वय ४०, रा. महादेववाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.तर अन्य कामगारांवर कोयना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.घटनेनंतर रुग्णालयातून पोलिस ठाण्यात माहिती कळवण्यात आली. याप्रकरणी माणिक रंगराव पाटील(४६,रा.लाडेगाव)यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.

Advertisement
Tags :

.