Karad Crime | 'तू सागरला का मारले?' जुन्या वादाचा असा काढला वचपा; कराडमध्ये रक्ताळलेला सूड
01:34 PM May 08, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
कोयनावसाहत परिसरात लाथाबुक्क्यांसह विटांनी मारहाण
Advertisement
कराड : जुन्या वादाच्या रागातून कोयनावसाहत परिसरात एका आचारी काम करणाऱ्या व्यक्तीवर तिघांनी लाथाबुक्क्यांनी व विटांनीहल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदू चव्हाण हे बनवडी फाटा येथील एकाहॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात.
४ मे रोजी रात्री काम आटोपून घरी आल्यानंतर उकाडा जाणवत असल्याने ते घराशेजारील बंद दुकानाच्या पायरीवर बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी'तू सागर पवारला का मारले' असा जाब विचारत शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. भांडणाच्या ठिकाणी घराचे बांधकाम सुरू असल्याने तेथे पडलेल्या विटांनीही मारहाण करण्यात आली.
Advertisement
Advertisement