महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोरोची येथे तीन पानी जुगार अड्डयावर छापा;सात जणाना अटक

11:07 AM Nov 10, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

रोख रोकडीसह 7 मोबाईल हॅण्डसेट, एक चार चाकी गाडी आणि 5 दुचाकी असा 6 लाख 4 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Advertisement

इचलकरंजी प्रतिनिधी

Advertisement

कोरोची (ता. हातकणंगले) गावालगतच्या शिंदे यांच्या शेतामध्ये सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या सात जणाना अटक केली. त्यांच्याकडून 27 हजार 400 रुपयांची रोकड, 57 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 7 मोबाईल हॅण्डसेट आणि 5 लाख 20 हजार रुपये किंमतीची एक चारचाकी गाडी आणि 5 दुचाकी असा 6 लाख 4 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपाअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या विशेष पथकाने केली. या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अटक केलेल्याच्यामध्ये विवेक धनाजी पांढरपट्टे (रा. आण्णा भाऊ साठे नगर, कोरोची), नितीन भुपाल माने ( रा इंदीरानगर, कोरोची ), पवन बाबासो पाटील ( रा. जैन मंदिरानजीक, कोरोची), संदीप सावता माळी ( रा. बाजार पेठ, राजवाडयाजवळ, बेडग ता मिरज जि. सांगली), संजय कुंडलीक चौगुले ( रा. बाबासाहेब आंबेडकरनगर हातकणंगले), दिपक बाबासो काले (रा. बौध समाज मंदीर कोरोची), रविंद्र भरमू आवटी (रा. विवेकानंदनगर कोरोची) यांचा समावेश आहे.

कोरोची गावालगतच्या शिंदे यांच्या शेतामध्ये सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्डा सुरु आहे. यांची माहिती पोलीस उपाअधीक्षक साळवे यांना बातमीदाराकडून समजली. त्यांनी यांची माहिती आपल्या कार्यालयाच्या विशेष पथकाला दिली. या पथकाने या जुगार अडडयावर छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या सात जणाना अटक केली. त्यांच्याकडून 27 हजार 400 रुपयांची रोकड, 57 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 7 मोबाईल हॅण्डसेट आणि 5 लाख 20 हजार रुपये किंमतीची एक चारचाकी गाडी आणि 5 दुचाकी असा 6 लाख 4 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement
Tags :
arrestedkolhapurkorochitarunbharatraided
Next Article