For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान

07:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान
Advertisement

मोठा शस्त्रसाठाही जप्त : संबंधितांवर 49 लाखांचे बक्षीस

Advertisement

वृत्तसंस्था/नारायणपूर, जगदलपूर

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दलांनी 49 लाख ऊपयांचे बक्षीस असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून जवानांनी तब्बल 124 तास विशेष मोहीम राबवत ही कारवाई यशस्वी केली. नक्षलवाद्यांच्या तळाला घेराव घालून मोठी कारवाई करण्यात आल्याने मोहीमेत सहभागी जवानांचे कौतुक होत आहे. नारायणपूर पोलिसांनी अबुझमाडच्या पारडी जंगलात केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी “माड बचाओ” मोहीमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत माओवादी संघटनेचे तीन प्रमुख कार्यकर्ते ठार झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीकेएसझेडसी रुपेश, डीव्हीसीएम जगदीश आणि पीपीसीएम सरिता यांचा समावेश आहे. त्यांच्या शिरावर अनुक्रमे 25, 16 आणि 8 लाख असे एकंदर 49 लाख ऊपयांचे बक्षीस होते, अशी माहिती बस्तरचे आयजी सुंदर राज पी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Advertisement

22 सप्टेंबर रोजी पोलिसांना अबुझमाड भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. या माहितीची पुष्टी करण्यासाठी नारायणपूर, कोंडागाव आणि दंतेवाडा येथील डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफचे संयुक्त पथक या कारवाईत तैनात करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान तीन माओवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून एके-47, इन्सास, एसएलआर, कार्बाइन, 303 रायफल, 12 बोअरची बंदूक, बीजीएल लाँचर आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटक साहित्य आणि नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू जप्त केल्या. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना पाच दिवस अबुझमाडमधील दुर्गम आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.

Advertisement
Tags :

.