दोन अल्पवयीन दुचाकीचोरांकडून तीन मोटारसायकली जप्त
सांगली :
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका महाविद्यालयाच्या पार्किगमधून गाड्या चोरून त्या विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघां बालकांना विश्रामबाग पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणांचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सातत्याने मोटारसायकलीची चोरी होत होती. त्यामुळे विश्रामबाग ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी या चोरीचा छडा लावण्याचा आदेश प्रकटीकरण शाखेकडे दिला होता. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील बिरोबा नरळे यांनी याबाबत माहिती काढण्यास प्रारंभ केला त्यावेळी त्यांना दोन अल्पवयीन मुले एक मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला त्यावेळी दोन बालके एक मोटारसायकल घेवून आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर मात्र त्यांना चांगलेच फैलावर घेतल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली आणि मग त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक चेतन माने, बिरोबा नरळे, संदीप साळुंखे, अमर मोहिते, महमद मुलाणी, प्रशांत माळी, योगेश पाटील यांनी पार पाडली.