For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहम्मद नवाजवर तीन महिन्यांची बंदी

06:08 AM Jul 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोहम्मद नवाजवर तीन महिन्यांची बंदी
Advertisement

वृत्तसंस्था, दुबई

Advertisement

उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने पाकचा अष्टपैलू आणि फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजवर तीन महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालु वर्षीच्या प्रारंभी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेवेळी नवाजने निर्बंध घातलेले द्रव घेतल्याचे आढळून आले.

पाकचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू मोहम्मद नवाजने आयसीसीच्या उत्तेजक विरोधी नियमाचा भंग केल्याबद्दल तसेच या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची थट्टा केल्याप्रकरणी नवाजवर घेण्यात आलेल्या कारवाईच्या निर्णयामध्ये 1 मे रोजी थोडा बदल करण्यात आला होता आणि त्याच्या बंदी कालावधीमध्ये एक महिन्याची कपात करण्यात आली होती. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 7 फेब्रुवारी रोजी कोलंबोत झालेल्या पाक आणि नेदरलँड्स यांच्या सामन्यानंतर 32 वर्षीय मोहम्मद नवाजची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये त्याच्या मुत्रल नमुन्यात निर्बंध घातलेले कार्बोक्साय टीएचसी हे द्रव आढळले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.