महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेनंतर तीन मंत्री बदलण्याची शक्यता

10:30 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपच्या वरिष्ठ नेत्याची महिती

Advertisement

पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर दोन ते तीन मंत्र्यांना बदलण्याची शक्यता भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी बी. एल. संतोष यांच्या संदर्भात व त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेची जी महिती उघड केली, त्याबद्दल भाजपच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली. सर्वांनीच पक्षशिस्त बाळगणे आवश्यक आहे. याउपर आपण  काहीही बोलणार नाही, असे सदर नेत्याने सांगितले. आणखी तीन मंत्र्यांना वगळून तीन जणांना मंत्रीमंडळात संधी दिली जाणार आहे, परंतु ती आता नाही.  लोकसभा निवडणुकीनंतर. सध्याच्या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर गोव्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. जो बदल आवश्यक होता तो 1 वर्षांनंतर केलेला आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतरच तीन मंत्री आवश्यक असल्यास बदलले जातील. त्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे असे सदर नेत्याने सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article