नागालँडमध्ये एकाच परिवाराच्या तीन सदस्यांची निर्घृण हत्या
आरोपीकडून पोलीस स्थानकात आत्मसमर्पण
वृत्तसंस्था/ कोहिमा
नागालँडच्या निउलँड जिल्ह्यात एका परिवारातील तीन सदस्यांची त्यांचा नातलग असलेल्या अब्दुल गोफुरने हत्या केली आहे. मृतांमध्ये 35 वर्षीय अशातुल आणि त्यांची 12 वर्षीय मुलग तसेच 6 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हत्येनंतर आरोपीने शस्त्रासह पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले आहे. याप्रकरणी तपास सुरू असून हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तर कोहिमाच्या ओल्ड मिनिस्टर्स हिल भागात एका 22 युवतीचा मृतदेह तिच्याच घरानजीक सापडला आहे. ही युवती नागालँडची प्रसिद्ध बास्केटबॉलपटू होती. या हत्येप्रकरण गुन्हा नोंदवून घेत विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. नागालँडच्या राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. अनेक नागरी संघटनांनी या क्रूर हत्येची निंदा केली आहे. तर यापूर्वी रविवारी लॉँगलेंगनजीक दोन जण हिट-अँड-रनच्या घटनेमुळे मृत्युमुखी पडले होते. याप्रकरणी न्याय मिळावा या मागणीवरून स्थानिक लोकांनी निदर्शने कली आहेत.