महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादी हल्ल्यात तिघांना हौतात्म्य

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूंछमध्ये लष्करी वाहनावर गोळीबार, अनेक जवान जखमी, शोधमोहीम सुरू

Advertisement

वृत्तसंस्था /जम्मू

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुऊवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 लष्करी जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच अन्य काही जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्यानंतर चकमक झडल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागातील लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. सुरनकोट तालुक्यातील बाफलियाज पोलीस स्टेशन मंडी रोड येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या घटनेनंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. गोळीबाराला वेळीच प्रत्युत्तर देत लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, राजौरी-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजौरी येथील थानामंडी येथील डेरा गल्लीत दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान गुरुवार, 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.45 वाजता लष्कराच्या दोन गाड्या जवानांना ऑपरेशन एरियामध्ये घेऊन जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. 48 राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक बुधवारी संध्याकाळपासून या भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील संयुक्त मोहिमेंतर्गत लढत होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत आता अतिरिक्त सैनिक घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले. तसेच एकीकडे ही चकमक सुरू असतानाच दुसरीकडे किश्तवाड पोलिसांनी परवेझ अहमद उर्फ हरिस याला पकडण्यात महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. गेल्या महिन्यात राजौरीतील कालाकोट येथे लष्कर आणि विशेष दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर दोन पॅप्टनसह सैनिक हुतात्मा झाले होते. हा भाग दहशतवाद्यांचा बालेकिल्ला आणि गेल्या काही वर्षांत लष्करावरील मोठ्या हल्ल्यांचे केंद्र बनला आहे. यावषी एप्रिल आणि मे महिन्यात राजौरी-पुंछ भागात झालेल्या हल्ल्यात 10 जवान हुतात्मा झाले होते. गेल्या दोन वर्षांत या प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 35 हून अधिक जवान हुतात्मा झाले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article