For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

Satara Breaking : कराडजवळ भीषण अपघातात तिघे ठार! कोल्हापूरच्या पोलिसासह महिला, युवकाचा समावेश

03:16 PM Oct 14, 2023 IST | Abhijeet Khandekar
satara breaking   कराडजवळ भीषण अपघातात तिघे ठार  कोल्हापूरच्या पोलिसासह महिला  युवकाचा समावेश
Three killed in terrible accident

कराड प्रतिनिधी

महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत. मृतामध्ये कोल्हापूर पोलीस दलात एका पोलिसाचा समावेश आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी आणि कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता.

Advertisement

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) गावच्या हद्दीत हॉटेल भाग्यलक्षीनजीक एक मालट्रक बंद पडला होता. दरम्यान, कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्‍या वॅगनर कारने (क्र. एम. एच. 01 ए. एल. 5458) मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील दोन पुरूष आणि एक महिला जागीच ठार झाली. मृतांमध्ये कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असणारे कॉन्स्टेबल नितीन पोवार तसेच भारती जाधव यांचा समावेश आहे. अन्य एका मृताची ओळख पटलेली नाही. कोल्हापूरहून ते पुण्याकडे चालले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

कराडजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा पसरली. तसेच पोलीस सहकार्‍यांनी नितीन पोवार यांना समाज माध्यमांवर श्रध्दांजली वाहिली. पुणे-बंगळुरू महामार्गावर अलिकडे झालेला हा सर्वात भीषण अपघात आहे. अपघातावेळी मोठा आवाज झाल्यानंतर आजुबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. हायवे मदत केंद्राचे दस्तगीर आगा व त्यांचे सहकारी तसेच कराड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह कारमधून बाहेर काढले. एक मृतदेह अक्षरश: ओढून काढावा लागला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.