For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टेडियमचे छत कोसळून तेलंगणात तिघांचा मृत्यू

06:22 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्टेडियमचे छत कोसळून तेलंगणात तिघांचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ रंगारेड्डी

Advertisement

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी बांधकाम सुरू असलेले खासगी इनडोअर स्टेडियम कोसळून तीन जण ठार तर 10 जखमी झाले. हे स्टेडियम मोईनाबाद परिसरात बनवले जात आहे. मदत व बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच अन्य सात जखमींना स्थानिक ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोईनाबाद भागात बांधकामाधीन इनडोअर स्टेडियमचा काँक्रीट स्लॅब आणि कंपाऊंड भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांची ओळख पटली असून सदर कामगार पश्चिम बंगाल आणि बिहार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. कामगारांवर कंपाऊंडची भिंत कोसळल्याने दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. उपचारादरम्यान अन्य एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीन वर पोहोचला आहे. जखमी कामगारांना ऊग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून संबंधित इमारत मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement

.