For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुर्टी, म्हापा, नईबाग अपघातात तीन ठार

12:38 PM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुर्टी  म्हापा  नईबाग अपघातात तीन ठार
Advertisement

कुर्टीत कुंडईच्या युवकने गमावले प्राण : म्हापा येथे ट्रकमधील मेकेनिकचा मृत्यू,नईबाग अपघातात महिलेचा हकना बळी

Advertisement

फेंड़ा, पेडणे : राज्यात काल शुक्रवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला. कुर्टी-फोंडा येथील स्वयंअपघातात श्रवण हरी नाईक (19 वर्षे, वाडीवाडा-कुंडई) हा युवक ठार झाला. म्हापा-पंचवाडी येथील धोकादायक वळणावरील अपघातात टँकरमधील मॅकेनिक हसन अब्बास शिलेदार (42 वर्षे, आनंदवाडी-सावर्डे) याला मृत्यू आला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. पेडणे तालुक्यातील नईबाग येथील धोकादायक जंक्शनवर झालेल्या तिसऱ्या अपघातात ट्रकने स्कुटरला धडक दिल्याने सुनिता राजाराम नाईक (50 वर्षे, राजवेल तोरसे) ही महिला जागीच ठार झाली. कुर्टी-फोंडा येथील सावित्री हॉलजवळील उ•ाणपुलावर सुसाट वेगाने विजेच्या खांबावर धडक दिल्याने झालेल्या स्वयंअपघात केटीएम दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. श्रवण हरी नाईक (19, वाडीवाडा-कुंडई) असे त्याचे नाव आहे. अपघाताची घटना काल शुक्रवारी दुपारी 11.30 वा. सुमारास घडली.

सुसाट वेगाने दुभाजकाला दिली धडक

Advertisement

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हा आपल्या मित्राच्या केटीएम जीए 07 एम 3299 दुचाकीने उसगांवहून फोंड्याच्या दिशेने उ•ाणपुलावरून येत असताना हा अपघात घडला. रेसिंगचा थरार करीत एकेरी मार्गावर सुसाट वेगाने त्याने दुभाजकावरील वीज खांबाला जबरदस्त धडक दिली. यावेळी त्याने हेल्मेट परिधान केले नसल्याचेही आढळले आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तो दुभाजकामध्ये पडला होता. तात्काळ त्याला 108 रूग्णवाहिकेने फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला आहे.

विनाहेल्मेट रेसिंगचा थरार जीवावर बेतला

गोवा ते बेळगांव महामार्गाचा फोंडा येथील शापूर ते कुर्टी हा फ्लायओव्हर सद्या युवकांमध्ये रेसिंगचा पॉईट म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. श्रवण याने आपल्या मित्राची दोन दिवसापुर्वी घेतलेली केटीएम घेऊन अन्य मित्रांबरोबर बाईक रेस  लावली होती, अशी माहिती काही उपस्थित लोकांनी दिली. फ्लायओव्हरवरून रेसिंग करताना त्याने हेल्मेटही परिधान केले नव्हते.

अपघातानंतर मित्रांनी काढला पळ

अपघातानंतर श्रवणीची मदत करण्याऐवजी मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे आढळले आहे. याप्रकरणीही फोंडा पोलीस कसून चौकशी करीत असून फ्लायओव्हरवरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्याची मोहीम पोलिसांनी  हाती घेतली आहे. श्रवण हा इयत्ता बारावीपर्यंत फर्मागुडी येथील पीईएस उच्च माध्यमिकच्या वाणिज्य शाखेत शिकल्यानंतर तेथील टाटा स्कील इन्स्टिट्यूट येथे 1 वर्षाच्या इंटर्नशिपचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्याच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी हवालदार सज्योत तळावलीकर यांनी पंचनामा केला असून उपनिरीक्षक प्रगती मळीक अधिक तपास करीत आहे.

नईबागेत ट्रकने ठोकरल्याने पत्नी ठार

पेडणे तालुक्यातील नईबाग येथे महामार्ग जंक्शन येथे ट्रकने स्कुटरला मागून धडक दिल्याने आपल्या पतीसोबत स्कुटरवर मागे बसलेली सुनिता राजाराम नाईक (50 वर्षे, राहणारी राजवेल तोरसे) ही महिला जागीच ठार झाली. ट्रकच्या धडकेत स्कुटरस्वार राजाराम नाईक व त्याची मागे बसलेली पत्नी सुनिता हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. सुनिता नाईक हिच्या अंगावऊन ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. राजाराम नाईक (58 वर्षे) हेही गंभीर जखमी झाले. त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा पंचनामा पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर,     हवालदार एरिक फर्नांडिस, शषांक साखळकर आदी पोलिसांनी पंचनामा केला.

अँब्युलन्स, पोलिस पोहोचले उशिरा

अपघात होऊन एक तासानंतर पोचली 108 ऊग्णवाहिका. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अपघात  झाल्यानंतर खूप वेळ सुनिता रस्त्यावर पडून होती. पेडणे पोलिसही उशिरा पोहोचले.

नईबाग जंक्शन बनलेय मृत्यूचा सापळा

राष्ट्रीय महामार्गावर नईबाग येथे आसलेले हे जंक्शन मृत्यूचा सापळा बनले आहे. याठिकाणी आतापर्यंत आनेक अपघात झाले. माञ सरकारी यंञणेला जाग येत नाही. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी एम. व्ही. आर. या रस्ता बांधकाय कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार या धोकादायक जंक्शनबाबत सूचना कऊनही त्यांना जाग आलेली नाही.

जंक्शनबाबत सरकार गंभीर नाही : तेली

नईबाग जंक्शानबाबत सरकार गंभीर नाही, असे स्थानिक पंचायत सदस्य एकनाथ तेली यांनी सांगितले. या ठिकाणी अनेक अपघात होतात, माञ त्यावर सरकारने आणि रस्ता विभागाने ठोस पाऊले उचलावी आणि कृती करावी. या भागात सर्व्हिस रस्तेही सुरळीत केलेले नाहीत. सर्व्हिस रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावी, अशी मागाणी एकनाथ तेली यांनी केली.

पंचवाडीत एक ठार, तिघे जखमी

म्हापा-पंचवाडी येथील धोकादायक वळणावर टुरिस्ट टॅक्सी, आरएमसी ट्रक व पाणीवाहू टँकरच्या अपघातात टँकर कलंडल्याने टँकरमधील मॅकेनिकचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हसन अब्बास शिलेदार (42, रा. आनंदवाडी-सावर्डे) असे मृत इसमाचे नाव आहे. अपघाताची घटना काल शुक्रवार दुपारी 11 वा. सुमारास घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाणीवाहू टँकर जीए 01 झेड 1305 पंचवाडीहून फोंड्याच्या दिशेने येत होता. सावर्डे येथे जाण्यासाठी धोकादायक वळणावरील अरूंद रस्त्यावर समोरून येणारा आरएमसी क्रॉकीटवाहू ट्रकला निसटती धडक दिल्यानंतर टुरिस्ट टॅक्सीला धडक देऊन टँकर कलंडला. यात टँकरमधील मॅकनिक म्हणूक कार्यरत असलेला हसन अब्बास कॅबिनमध्ये अडकल्याने जागीच ठार झाला. टँकरचालक व अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मडगाव येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मयत हसन याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून साहाय्यक उपनिरीक्षक तुषार लोटलीकर अधिक तपास करीत आहेत. जखमी झालेल्यांमध्ये  ट्रकचालक संदेश देसाई, चंद्राली कोरगावकर, हुसेनसाब जनातकर यांचा समावेश आहे. फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एकाचवेळी कुर्टी फोंडा व म्हापा पंचवाडी येथे अपघात घडल्याने फोंडा पोलिसांचीही धावपळ  उडाली.

Advertisement
Tags :

.