गॅस सिलिंडर गळतीने झारखंडमध्ये तिघे ठार
06:22 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ धनबाद
Advertisement
झारखंडमधील धनबाद जिह्यातील मुनिडीह परिसरात रविवारी सकाळी गॅस गळती होऊन तिघांचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. प्राथमिक तपासानुसार, भंगार चोरीदरम्यान ही दुर्घटना घडली. काही लोक भंगार चोरण्याच्या उद्देशाने घटनास्थळी आले होते. याप्रसंगी त्यांनी भरलेला गॅस सिलिंडर कापण्याचा प्रयत्न करताच गळती सुरू झाली. गॅसच्या तीव्र वासामुळे उपस्थित असलेले लोक काही क्षणातच बेशुद्ध झाले. या निष्काळजीपणाचे रुपांतर एका गंभीर दुर्घटनेत झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास करत आहेत. या अपघाताने बेकायदेशीर कृत्ये आणि निष्काळजीपणाचे धोकादायक परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.
Advertisement
Advertisement