महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्णेत कार कोसळून तीन ठार

11:28 AM Nov 29, 2024 IST | Radhika Patil
Three killed in car accident in Krishna
Advertisement

सांगली : 

Advertisement

सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली येथील कृष्णानदीच्या पात्रात कार कोसळून सांगलीतील पती पत्नीसह तिघे जागीच ठार झाले. गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगलीकडे भरधाव वेगाने येणारी ही कार तब्बल 30 फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात सांगलीतील खेडेकर आणि नार्वेकर कुटुंबावर काळाने घाला घातला. मयतात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा समावेश असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमीवर सांगलीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

कोल्हापूर येथे नातेवाईकाच्या लग्नाहून परत सांगलीकडे येत असताना हा अपघात घडला. अंकलीनजीक जॅकवेलजवळ ग्रॅन्ड आयटेन ही गाडी पुलावरून थेट कृष्णा नदीच्या पात्रात खाली कोसळली. रात्रीची वेळ आणि कडाक्याची थंडी असल्याने सांगली कोल्हापूर रोडवर वाहतूक तुरळक होती. गाडी खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज आला. जॅकवेलजवळ असणाऱ्या काही लोकांनी हा आवाज ऐकून अपघात झाल्याच्या ठिकाणी पुलाच्या बाजूला धाव घेतली. त्यावेळी सदरची गाडी पात्राच्या जवळ खाली पडल्याचे दिसून आले. यातील काही लोकांनी तातडीने या घटनेची जयसिंगपूर पोलिसांना माहिती दिली. रात्रीच गाडी कोसळल्याच्या ठिकाणी खाली जाऊन पोलीस व स्थानिक लोकांनी खाली जावून मदत कार्य सुरू केले.

या भीषण अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर वय 36 व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय 30 दोघे रा. नरसोबा बोळ, गावभाग सांगली यांच्यासह प्रसाद यांची भाची वैष्णवी संतोष नार्वेकर (वय 21 रा. गंगाधरनगर आकाशवाणी केंद्र जवळ सांगली) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर समरजीत प्रसाद खेडेकर (वय सहा, वरद संतोष नार्वेकर (वय 19) व साक्षी संतोष नार्वेकर (वय 42) सर्व रा. सांगली हे जखमी झाले. जखमीना तातडीने सांगलीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीपैकी साक्षी नार्वेकर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर येथे लग्न समारंभाचा कार्यक्रम संपवून खेडेकर व नार्वेकर कुटुंबिय एकाच गाडीतून रात्री उशिरा सांगलीकडे परतत असताना उदगावच्या अलीकडे रस्त्याचा अंदाज न आल्याने जुन्या लोखंडी पुलावरून गाडी थेट नदीच्या पात्रात उजव्याबाजूला कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत. अपघात इतका भयानक होता की जखमींना बाहेर काढताना खूपच अडचणींना तोंड द्यावे लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जयसिंगपूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तर व्रेनच्या सहाय्याने गुरूवारी दुपारी गाडी वर काढण्यात आली. यावेळी सांगली कोल्हापूर रोडवर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये जखमी वरद संतोष नार्वेकर यांनी फिर्याद दिली.

खेडेकर, नार्वेकर कुटुंबावर काळाचा घाला

लग्न समारंभाहून परतत असताना झालेल्या अपघातात सांगलीतील खेडेकर व नार्वेकर कुटुंबियावर काळाने घाला घातला. अपघातात मयत झालेले प्रसाद खेडेकर हे सांगलीच्या नरसोबा बोळ येथे सुवर्ण व्यावसायिक म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील भालचंद्र खेडेकर यांनी सुरू केलेला सुवर्ण कारागिरीचा व्यवसाय मुलगा प्रसाद यांनी पुढे चांगलाच वाढवला. ऐन तारूण्यात प्रसाद व त्यांच्या कुटुंबियावर काळाने घाला घातला. अपघाताबद्दल सांगलीतील सराफी पेठेसह शहरातून हळहळ व्यक्त होत होती. मयत तिघावर गुरूवारी दुपारी सांगलीच्या अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article