मध्यप्रदेशात भरधाव जीपची दुचाकीला धडक, तीन जणांचा मृत्यू
कालव्यात सापडले तिघांचे मृतदेह
वृत्तसंस्था/ भिंड
मध्यप्रदेशच्या भिंडमध्ये एका भरधाव जीपने बाइकला टक्कर मारली आहे. बाइकसमवेत यावरुन प्रवास करणारे 3 युवक यानंतर नजीकच्या कालव्यात कोसळले. या दुर्घटनेत या तिन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचाही मृतदेह कालव्यातून हस्तगत करण्यात आला आहे. ही दुर्घटना बरहा कालव्यानजीक घडली आहे. चालकाने जीपवरील संतुलन गमावत थेट बाइकला टक्कर मारली होती.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. अनेक तासापर्यंत कालव्यात शोधमोहीम राबविण्यात आली, ज्यानंतर 3 मृतदेह हस्तगत करण्यात आले. राजेंद्र चौहान, अमरसिंह चौहान आणि चुन्नीलाल अशी मृतांची नावे असून ते हेतमपुरा येथील रहिवासी होते. बाइकवरून ते रावतपूर सानी गावात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जीपचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.