For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूरात सर्किट बेंचमध्ये तीन न्यायमूर्तीची नियुक्ती

04:59 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूरात सर्किट बेंचमध्ये तीन न्यायमूर्तीची नियुक्ती
Advertisement

                                कोल्हापूर सर्किट बेंचला नवे प्रशासकीय नेतृत्व

Advertisement

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये प्रशासकीय पातळीवर महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. सध्या प्रशासकीय न्यायमूर्ती असलेले मकरंद कर्णिक, तसेच न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर आणि शिवकुमार दिगे यांची बदली झाली आहे. या बदल्यांनंतर न्यायमूर्ती एन. व्ही. सूर्यवंशी यांची कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रशासकीय न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासोबत न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांचीही सर्किट बेंचमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती दिगे यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात झाली असून, न्यायमूर्ती चपळगावकर यांची औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त झालेल्या न्यायमूर्ती अवचट आणि जोशी यांनी यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली असून,
तीन न्यायमूर्तीची बदली ते डिव्हिजन बेंचचे कामकाज पाहणार आहेत.

Advertisement

दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचच्या विस्ताराची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. सध्याच्या डिव्हिजन बेंचव्यतिरिक्त लवकरच आणखी एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल बेंच सुरू होणार आहेत. नवीन डिव्हिजन बेंच स्वतंत्र इमारतीत कार्यान्वित होईल, तर सहा मजली इमारतीत दोन सिंगल बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या नव्या न्यायालयीन कामकाजाचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती वकील संघटनांकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.