कोलंबो विमानतळावर तीन भारतीयांना अटक
06:48 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ कोलंबो
Advertisement
श्रीलंकेत तीन भारतीय नागरिकांना कथित स्वरुपात 50 किलो गांजा बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अमली पदार्थाचे मूल्य जवळपास 14.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप ठरली आहे.
संशयित प्रवासी हे बँकॉकहून श्रीलकन एअरवेजच्या विमानाने बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींचे वय 25-27 वर्षांदरम्यान असून त्या मुंबईच्या रहिवासी असून शिक्षिका असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तिन्ही आरोपी ग्रीन चॅनेलद्वारे पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर हे प्रवासी 50 किलो गांजा स्वत:सोबत नेत होते अशी माहिती पोलीस नार्कोटिक्स ब्युरोने दिली आहे.
Advertisement
Advertisement