For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | सोलापूर–पुणे महामार्गावर तीन घरफोड्या; ३.६२ लाखांचा ऐवज लंपास

03:46 PM Feb 25, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   सोलापूर–पुणे महामार्गावर तीन घरफोड्या  ३ ६२ लाखांचा ऐवज लंपास
Advertisement

                              सोलापुरात भरदिवसा घरफोडीचा थरार

Advertisement

सोलापूर -पुणे महामार्गावरील मडकी बस्ती परिसरातील गणेश नगरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच वेळी तीन घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी तीन बंद घरांचे कुलूप तोडून तब्बल ३ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

संतोष रमाकांत जोशी (रा. गणेश नगर, मडकी बस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जोशी हे २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान घराबाहेर गेले असताना ही चोरी झाली. चोरट्यांनी जोशी यांच्या घराचा (प्लॉट नं. ३०९) दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटातून १८ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, अंगठी, टॉप्स आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा माल चोरला. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जोशी यांच्या शेजारील अंबिका राजू गुंते (प्लॉट नं. ३०८) यांच्या घरातील २४ हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स आणि सिद्धेश्वर दिगंबर गोटे (प्लॉट नं. ३१०) यांच्या घरातील १ लाख ८ हजार रुपयांचे दागिने (अंगठी, टॉप्स, साखळ्या) लंपास केले. चोरट्यांनी कपाटांचे लॉक तोडून अत्यंत शिताफीने ही चोरी केली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.