जिल्ह्यातील तिघांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार
04:17 PM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
रामपूर :
Advertisement
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार यावर्षी जिह्यातील तीन मुख्याध्यापकांना जाहीर झाला आहे.
यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक महावीर कुसनाळे, खेड तालुक्यातील गुणदे येथील सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी जोशी व लांजा तालुक्यातील साटवली येथील रा. सि. बेर्डे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन कांबळे यांचा समावेश आहे. राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या 13 एप्रिल रोजी होणाऱ्या राज्य अधिवेशनात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
Advertisement
Advertisement