'लेखा परीक्षण'चे तिघे 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
रत्नागिरी :
रत्नागिरीतील स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयाच्या अहवालात फेरफार करण्यासाठी 16 हजार 500 ऊपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक संचालक, सहाय्यक लेखाधिकारी आणि कंत्राटी शिपाई अशा तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आल़ी लाचलुचपत विभागाने गुऊवारी सायंकाळी ही कारवाई केल़ी दापोली पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होत़ी लाचलुचपतने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांविऊद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
सतेज शांताराम घवाळी (कंत्राटी शिपाई), सिद्धार्थ विजय शेट्यो (सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी) व शरद रघुनाथ जाधव (सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालय, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ गुह्यातील माहितीनुसार, तक्रारदार हे दापोली पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत़ तक्रारदार यांनी दापोली पंचायत समितीचे 2020ा21 आणि 2021ा22 या वर्षाचे लेखा परीक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुपालन अहवाल लेखा परीक्षण कार्यालयात सादर केला होत़ा तरीही अंतिम अहवाल देण्यासाठी संशयितांनी 24 हजारांची मागणी केली होत़ी
या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल़ी त्यानुसार लाचलुचपत विभागाने संशयितांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचल़ा 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.46 वाजता सतेज घवाळी यांनी तक्रारदाराकडून 16 हजार 500 ऊपये स्वीकारून ती रक्कम सिद्धार्थ शेट्यो यांच्याकडे दिली. हा प्रकार शरद जाधव यांच्या संमतीने होत असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांविऊद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 7(अ) व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल़ा
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांच्या पथकाने केली. दरम्यान, शासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांचे एजंट यांच्याकडून कोणतीही लाच मागणी होत असल्यास त्वरित दूरध्वनी 02352ा222893 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना केले आहे.