For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News: दारूच्या नशेत टोळक्यांची धावत्या वाहनांवर दगडफेक, CCTV फुटेज व्हायरल

03:53 PM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
karad news  दारूच्या नशेत टोळक्यांची धावत्या वाहनांवर दगडफेक  cctv फुटेज व्हायरल
Advertisement

कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील धक्कादायक प्रकार, तिघे संशयित ताब्यात

Advertisement

कराड: दारू पिलेल्या अवस्थेत कराडच्या कोल्हापूर नाक्यावर तिघांनी शुक्रवारी रात्री दहशत माजवली. हायवेच्या अवजड वाहनांसह इतर वाहनांना अडवून दगडफेक करण्यात आली. टोळक्याच्या कारनाम्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून भेलकांडत ट्रकवर दगडफेक करताना संशयित कैद झाले आहेत.

यातील एकाने चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रात्री उशिरा तीन संशयितांना कोल्हापूरातुन ताब्यात घेतले. दगडफेक करणारे संशयित तेच होते का? याची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दारू पिलेल्या अवस्थेतील एक टोळके कराडच्या कोल्हापूर नाक्यावर वावरत होते. तिघेही भेलकंडत एकमेकांना आधार देत चालत होते. यादरम्यान नेमके काय झाले हे माहिती नाही पण यातील एकाने धावत्या ट्रकवर दगडफेक केली. एकजण दगडफेक करत असताना दुसऱ्याने ट्रक अडवला.

हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून त्यामध्ये तिघेजण दगडफेक करताना दिसत आहेत. त्यांना व्यवस्थित चालताही येत नसल्याचे दिसते. दगडफेक केल्यानंतर संशयितांपैकी एकाने थेट चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याने त्याला थांबवत बाजुला केले.

हे करत असताना ते दोघेही भेलकांडत रस्त्यावर पडताना व्हिडीओत दिसत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना हा प्रकार समजताच त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले. तोपर्यंत दगडफेक झालेली वाहने गेली होती तर संशयितांनीही पळ काढला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह पोलिसांनी जिथे घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी फुटेजच्या सहाय्याने संशयितांची माहिती काढली.

व्हिडीओत संशयित स्पष्ट दिसत नसले तरी पोलिसांच्या हाती शनिवारी सकाळीच महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. या प्रकाराने कराड शहरातून अनेकांनी संताप व्यक्त संशयितांवर कडक कारवाईची मागणी पोलिसांकडे केली.

Advertisement
Tags :

.