2 मृतदेहांसह समुद्रात 3 दिवस
समुद्रात एक छोटीशी नौका उलटली आणि पाहता पाहता तीन लोक बर्फासारख्या थंड पाण्यात अडकून पडले. 15 वर्षीय एक मुलगा कशाप्रकारे तरी उलटलेल्या नौकेवर चढला, परंतु त्याच्या भावाचा मृतदेह नौकेखाली होता. काही काळानंतर त्याच्या त्याच्या चुलत भावाचा मृतदेहही पाण्यात गेला, यानंतर सुरू झाला सुमारे तीन दिवसांपर्यंत जीवन अन् मृत्यूदरम्यान चालणारा संघर्ष.
ही कहाणी अमेरिकेच्या अलास्का येथील आहे. तेथे 15 वर्षीय डेरेक पार्कर अघनांगाने सुमारे 62 तास समुद्रात उलटलेल्या नौकेवर बसून काढले. चहुबाजूला केवळ थंड समुद्र होता आणि मदतीला कुणीच नव्हते. अखेर अमेरिकेच्या तटरक्षक दलाने त्याला शोधले आणि त्याचा जीव वाचविला.
भावांसोबत मासेमारी
डेरेक अलास्काच्या सवोंगा भागाचा रहिवासी आहे. तो स्वत:चा 35 वर्षीय भाऊ सिडनी कुलोवियी आणि 34 वर्षीय चुलत भाऊ बार्टन रुकूकसोबत छोट्या नौकेतून मासेमारीसाठी बाहेर पडला होता. तिघेही जी छोटी नौका म्हणजेच स्किफवर सवार होते, ती समुद्रात अचानक उलटली, नौका कशामुळे उलटली याची माहिती अद्याप स्पष्ट नाही. नौका उलटताच तिघेही संकटात सापडले, डेरेक कशाप्रकारे तरी नौकेच्या वर पोहोचला, पqqqरंतु त्याचा भाऊ सिडनी नौकेखाली अडकला.
शनिवार ते मंगळवार
तिघेही घरी न परतल्याने परिवार आणि अधिकाऱ्यांना चिंता वाटू लागली. अलास्का स्टेट ट्रूपर्सनी अमेरिकेच्या तटरक्षक दलाला याची माहिती कळविली. यानंतर समुद्र आणि आसपासच्या भागात शोध सुरू करण्यात आला. बचाव पथकाने सुमारे तीन दिवसांनी डेरेकला शोधून काढेल. तो जवळपास 62 तासांपर्यंत उलटलेल्या नौकेवर बसून होता. बचाव पथकाचो कॅप्टन अॅडम व्हाइट यांनी डेरेकच्या हिमतीचे कौतुक केले. शनिवारपासून मंगळवारपर्यंत हा मुलगा त्याच स्किफवर बसून राहिल्याचे कॅप्टन व्हाइट यांनी म्हटले आहे.
भाऊ नौकेखाली आहे!
डेरेकची अवस्था पाहून बचाव पथकही हैराण होते. तो बर्फासारख्या थंड पाण्यादरम्यान इतक्या दीर्घकाळापर्यंत कशाप्रकारे तरी स्वत:ला वाचवून होता. डेरेकने बचाव पथकाला माझा भाऊ अद्याप नौकेखाली असल्याचे सांगितले. बचावाच्या मागील रात्री माझा चुलत भाऊ नौकेवरून घसरत समुद्रात पडल्याची माहिती डेरेकने बचाव पथकाला दिली. म्हणजेच ज्या नौकेवर डेरेक स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बसला होता, त्याच्या खाली त्याच्या भावाचा मृतदेह होता आणि आसपास समुद्रात त्याच्या चुलत भावाचा शोध सुरू होता.
शरीराचे तापमान खालावू लागले
कोस्टगार्डच्या पथकाने डेरेकला नौकेतून बाहेर काढले, तेव्हा त्याच्या शरीरात हायपोथर्मियाची लक्षणे दिसू लागली होती. दीर्घकाळापर्यंत थंड पाणी आणि तीव्र थंडीच्या संपर्कात राहिल्याने शरीराचे तापमान अत्यंत कमी होऊ लागले होते. बचाव पथकाने त्याला ब्लँकेट ओढवू त्याचे शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रवासात त्याच्याशी सातत्याने संभाषण कर ण्यात आले, जेणेकरून तो जागा राहिल आणि त्याच्या स्थितीवर नजर ठेवता येईल. यानंतर टीमने त्याला नोम येथे नेल, जेथे तो स्वत:च्या परिवाराला भेटला.
भावांचा वाचला नाही जीव
या पूर्ण घटनेते डेरेक बचावला, परंतु त्याचा भाऊ आणि चुलत भाऊ वाचू शकला नाही. अलास्का डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीनुसार शोध पथकाला दोघांचे मृतदेह आढळून आले. 35 वर्षीय सिडनी कुलोवियी आणि 34 वर्षीय बार्टन रुकूक हे दोघेही सवोंगाचे रहिवासी होते. 15 वर्षीय डेरेकसाठी समुद्रात घालविलेले हे तीन दिवस बहुधा आयुष्यातील सर्वात अवघड क्षण राहिले असावेत. बर्फासारखे थंड पाणी, उलटलेली नौका, समोर मृत्यू आणि मदतीची प्रतीक्षा. या सर्वादरम्यान 62 तासांपर्यंत जिवंत राहणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.