For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम!

06:58 AM May 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
तीन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम
Advertisement

सेन्सेक्स 410 अंकांनी वधारला : औषध क्षेत्रात चमक

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी आशियाई बाजारातील तेजी दरम्यान सलग तीन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल यांच्या चमकदार कामगिरीने बाजारात पुन्हा तेजी परतली आहे. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) विक्री केल्याने बाजारातील तेजी कमी झाल्याचे दिसून आले.

Advertisement

बीएसई सेन्सेक्स सुमारे 140 अंकांच्या वाढीसह 81,327.61 वर सुरु झाला. अखेरच्या बीएसई सेन्सेक्स 410.19 अंकांनी वधारुन निर्देशांक 81,596.63 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 129.55 अंकांच्या वाढीसह 24,813.45 वर बंद झाला.

निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 0.78 टक्के आणि 0.38 टक्के वाढून बंद झाले. सर्व 13 प्रमुख क्षेत्रांचे निर्देशांक वाढीसोबत कार्यरत होते. निफ्टी रिअॅल्टीमध्ये सर्वाधिक 1.72 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय, निफ्टी औषध क्षेत्राचा निर्देशांक 1.25 टक्क्यांनी वाढून बंद झाला.

सेन्सेक्समध्ये, सनफार्मा, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. यामध्ये 0.5 टक्के ते 1.5 टक्के वाढ नोंदवली गेली. घसरणीच्या बाबतीत, इटर्नल, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये घसरण झाली. एफआयआयने 10,016 कोटी किमतीचे समभाग विकले.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यांनी 10,016.10 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) 21 मे रोजी 6,738.39 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

आशियाई बाजारपेठांमध्ये तेजी

बुधवारी आशियाई बाजारपेठांमध्ये तेजी होती. जपानचा निक्केई निर्देशांक स्थिर होता. तर कोस्पी 1.14 टक्के आणि एएसएक्स 200 0.6 टक्के वाढला. वॉल स्ट्रीटवर, एस अँड पी 500 0.39 टक्के घसरला. नॅस्डॅक कंपोझिट 0.38 टक्के घसरला आणि डाऊ 0.27 टक्के घसरला. एनव्हीडिया 0.9 टक्क्यांनी घसरला आणि एएमडी, मेटा, अॅपल आणि मायक्रोसॉफ्टमध्येही घसरण झाली.

Advertisement
Tags :

.