Sangli News : कुपवाडामधील टोळी दोन जिल्ह्यातून तडीपार, पोलीसांची कारवाई
टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलंय
कुपवाड : कुपवाड शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांची तिघांची टोळी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी कारवाई केली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली.
या तडीपार कारवाईत सराईत गुन्हेगार किरण शंकर लोखंडे (बय २३, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), संदेश रामचंद्र घागरे (वय २१, किरण लोखंडे रा. बाघमोडेनगर, कुपवाड), सोनू उर्फ बापू हरी येडगे (वय २८, रा. मायाक्कानगर, बामणोली ता. मिरज) या तिघांचा समावेश आहे.
या टोळीविरुद्ध सन २०२० ते २०२४ या कालावधीत संगनमत करून खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, अपहरण, बेकायदेशीर अग्शीशस्त्र व घातक हत्यारे जवळ बाळगून त्याचा धाक दाखवून व गंभीर दुखापत करणे, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तडीपार प्रस्ताव सादर केला होता.
अधीक्षक घुगे यांनी किरण लोखंडे टोळीला दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी सण, उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर, हवालदार बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे, संदीप पाटील यांनी