महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हावडा येथे एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले

06:11 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमधील हावडा येथे शनिवारी रेल्वे अपघात झाला. सिकंदराबाद-शालिमार एक्स्प्रेसचे 3 डबे ऊळावरून घसरले आहेत. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 5.30 वाजता कोलकात्यापासून 40 किमी अंतरावर असलेल्या नालपूर येथे हा अपघात झाला. आठवड्यातून एकदा धावणारी 22850 सिकंदराबाद-शालिमार एक्स्प्रेस खरगपूर विभागातील नालपूर स्थानकावरून जात असताना डबे ऊळावरून घसरले. यामध्ये एक डब्बा पार्सल व्हॅनचा असून दोन प्रवासी डबे होते. या घटनेनंतर सदर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सुमारे पाच तासांनी मुख्य मार्ग पूर्ववत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

या अपघातानंतर प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली. दक्षिण पूर्व रेल्वेने प्रवासी व नातेवाईकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन क्रमांक  जारी केले आहेत. गेल्या आठवड्यात तामिळनाडू आणि आसाममध्ये असेच अपघात झाले होते. तामिळनाडूतील बोदिनायकानूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसचे चाक ऊळावरून घसरले होते. आसाममध्ये, ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग-बदरपूर डोंगराळ भागात मालगाडीची एक बोगी ऊळावरून घसरल्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या प्रभावित झाल्या होत्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article