For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरभंगा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग

06:30 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
दरभंगा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दरभंगा एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आग लागण्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. छठपूजेच्या सणामुळे तिन्ही बोगी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतानाच ही घटना निदर्शनास आली. सुदैवाने आगीची माहिती मिळताच सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे जीवितहानी टळल्याचे समजते. मात्र, आगीत प्रवाशांचे सामान भस्मसात झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आले.

टेन क्रमांक 02570 दरभंगा क्लोन स्पेशल उत्तर प्रदेशातील सराय भूपत रेल्वे स्थानकावरून जात असताना ‘एस 1’ कोचमध्ये धूर आल्याचे पाहून स्थानक नियंत्रकांनी तात्काळ टेन थांबवली. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे उत्तर मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.