महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सिडनीत घराला आग लागून तीन मुलांचा मृत्यू

06:13 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलिसांना हत्येचा संशय

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा एका घराला आग लागून 10 महिन्यांच्या बाळासमवेत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचे पोलीस या घटनेला हत्या मानून तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेविषयी माहिती सिडनीच्या सिटी सेंटरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावरील लालोर पार्कमध्ये रात्री उशिरा 1 वाजता इर्मजन्सी सेवांना पाचारण करण्यात आले होते अशी माहिती दिली.

दोन आणि चार वर्षे वय असलेल्या दोन मुलांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, परंतु रुग्णालयात हलविण्यात आल्यावर त्यांचा मृत्यू झाला. तर आग विझविण्यात आल्यावर 10 महिन्यांची मुलगी मृत आढळून आली. तर रुग्णालयात 6 ते 11 वर्षांदरम्यान वय असलेल्या अन्य 4 मुलांची प्रकृती स्थिर आहे. तसेच मुलांच्या 29 वर्षीय आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

होमिसाइड स्क्वाडच्या हेरांनी तपास स्वत:कडे घेतला असून याला घरगुती हिंसेशी निगडित मानव हत्या मानण्यात आले आहे. ही आग जाणूनबुजून लावण्यात आली असावा असा संशय व्यक्त आहे. 28 वर्षीय युवक याकरता कारणीभूत असल्याचे तपास यंत्रणेचे मानणे असल्याचे होमिसाइड स्क्वाडचे कमांडर डिटेक्टिव्ह सुपरिटेंडेंट डॅनी डोहर्टी यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article