तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
कवठेमहांकाळ :
कवठेमहांकाळ तालुक्यातील अरेवाडी येथे एका मंदीराच्या मागे एका काळ्या रंगाची चार चाकीमध्ये तलवार बाळगल्या प्रकरणी तीन लाख 51हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन तिघांवर शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस निवृत्ती सोपान करांडे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी निवृत्ती करांडे हे गुरुवार दि.12 रोजी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना आरेवाडी ते ढालगाव येथे रात्री 8.30वा. एक काळ्या रंगाची चार चाकी संशयीत रित्या मिळुन आल्याने लागलीच दोन पंचाना बोलावुन पंचासमक्ष गाडीमध्ये असलेल्या इसमांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव समाधान धोंडीराम गडदे रा.आरेवाडी ता. कवठेमहांकाळ, रामचंद्र दिलीप केंगार वय-23 वर्षे रा. जाखापुर ता. कवठेमहांकाळ, राजकुमार शंकर माने वय-23रा. थ्जाखापुर ता. कवठेमहांळ असे असुन सदरची गाडी समाधान धोंडीराम गडदे यांची असून गाडी क्र.एम एच 04 ई एफ 3066 असा आहे. सदरच्या गाडीची सपोनि कोळेकर यांनी दोन पंचासमक्ष झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील सिटच्या मागे एक धारधार तलवार मिळुन आले.
तलवार बाळगल्या प्रकरणी शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला असून चारचाकी गाडी व तलवार असे एकूण 3 लाख 51 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक भापकर,पोलीस शिपाई निवृत्ती सोपाना करांडे,अभिजीत कासार,यांनी कारवाई केली.